MY BAPU-NANDAI

हरी ओम

 सहोपासना......बापूंची लाभेविण प्रिती

सहोपासना म्हणजे श्रीसद्‌गुरुक्षेत्रम्‌ मध्ये लहान मुलांप्रमाणे बागडण्याचा दिवस. खरंच आपल्या या प्रेमळ अणि केवळ प्रेमळ असणार्‍या बापूंनी हि संधी दिली. खूप खूप आनंद वाटला सहोपासना करताना. मला दत्तमंगलाचण्डिका स्तोत्र म्हणायला आले होते. आधी जरा टेन्शन आलं, कि आपलं म्हणून होईल कि नाही. पण खरंच आपल्याकडून आपला सद्‌गुरुच सगळं काही व्यवस्थित करून घेत असतो, याची पुन्हा प्रचिती आली. काहिंनी घरी तर काही केंद्रांनी सहोपासना एकत्र केली. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सद्‌गुरु माऊलीने केवळ आपल्या बाळांना आपल्या घोर तपश्चर्येचा लाभ मिळावा म्हणूनच सहोपासनेचा मार्ग खुला केला. हिच तर लाभेविण प्रिती.....जी केवळ आणि केवळ आपल्या बापूंकडेच आहे.....




******************************







 


To Read the original Article please visit


*********************************


प. पू. सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्रातर्फे ससून रुग्णालय, पुणे येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेतील काही क्षण........


 
 
 



प. पू. सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या कार्यकर्त्यांनी व भक्तांनी केलेल्या या सेवेची मिडीयाने घेतलेली दखल...........



**********************************************

 'चरखा - अन्नपूर्णा' योजना -
पुणे केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या चरखा शिबिराची माहिती पुण्यातील आघाडीच्या सकाळ या दैनिकाने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पुणे व आजूबाजूच्या परिसरातील चरखा योजनेची माहिती केंद्राच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
याचे संपूर्ण वृत्त पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


  'चरखा - अन्नपूर्णा' योजना


0000000000000000000000000000000000000000000000000


''गणपती बाप्पा मोरया'' 


"गणपती बाप्पा आला रे आला..........आपला घरचा गणपती आपल्या सगळ्याच्या घरी आला. आत्ताच मिरवणूक Haapy Home ला पोहोचली. प. पु. नंदाईने औक्शन केले.......आणि गणपती बाप्पा घरी आले. उद्या सकाळी ९ वाजता पूजा सुरु होऊन ११ पासून दर्शन सुरु होणार आहे.. तरी तुम्ही सगळ्यांनी दर्शनाला नक्की यायचे आहे......आणि आपल्या परिवारासहित..........आता नुसती मज्जा, धम्माल, मस्ती........धिंगाणा............आला आला आला माझा गणपती बाप्पा आला.......मिरवणुकीत सोमवारी नाचायचे नुसती धम्माल करायची ३ दिवस......आपल्या सगळ्यांच्या माहेरी..........चला तर मग........आता Happy Home लाच भेटूया.......
00000000000000000000000000000000000000

हरी ओम

GREEN GANESHA
Sadguru Shri Aniruddha Bapu's followers made eco-friendly idols ....Yes! Now everybody is taking note of our organization's Eco-friendly work. After sakal, the well-known daily newspaper, "Pune Mirror" had spend a large space for the article. One can understand what importance this seva mean to our society. As our P. P. Bapu always says, put your best in welfare of all, others will follow the same path to get some part from that best......
so that's why we are following our dearest P. P. Bapu.....and taking a lot of joy from his seva.......for others.....let them decide.....till then ROCKS GREEN GANESHA..........
to read the full article in Pune mirror click on the following link

00000000000000000000000000000

सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, पुणे तर्फे बनविण्यात येणाऱ्या गणेश मूर्तींचा उपक्रम पुण्यातील मिडीआने उचलून धरला आहे. गेली ६ वर्षे सातत्याने eco-friendly गणपती तयार करणाऱ्या आपल्या संस्थेचे कौतुक तर होतच आहे. मात्र बातमी घ्यायला आलेल्या सकाळच्या कार्माचार्यांनिदेखील हातोहात आपल्या संस्थेच्याच गणपती मूर्ती बुक केल्या. यामुळे आपल्या संस्थेचा उपक्रम किती परिणामकारक होत आहे ह्याचेच हे बोलके उदाहरण आहे. पुण्यातील गणपती सेवेच्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा......



 000000000000000000000000000000000

 नेमेची येवो असा पावसाळा......




मुंबईत जोरदार पाउस........धुवाधार बारीश.........अशा आणि अनेक news ऐकायला मिळत आहेत........पाउस म्हटला कि मुंबईकरांना २६ जुलै आठवल्याशिवाय राहणार नाही......पण या पावसाळ्यात मी आणखी एका 'मुसळधार' पावसाचा अनुभव घेतला........भरगच्च पावसात..........गुरुपौर्णिमेच्या दिवशी.....मला माहित आहे गुरुपौर्णिमेला खूपच दिवस होऊन गेले पण आजही तो अनुभव तितकाच जिवंत आहे........काही कारणामुळे हा अनुभव तुमच्याबरोबर share करायला वेळ लागला..........त्यासाठी sorry ..........पण आता यात वेळ घालविण्यापेक्षा मी खरी धम्माल सांगते........गुरुपौर्णिमेला मला stall ची सेवा मिळाली होती.....आणि माझा stall entry आणि exit gate च्या बरोबर मध्ये लावला होता..........सकाळपासून पावसाने नुसता कहर मांडला होता..........थोड्या वेळाने माझे बाहेर लक्ष गेले..........तिथे सकाळ काय पहाटेपासून रांग लावून उभे असलेले भक्त पावसात भिजून नाही तर ओलेचिंब होऊन आपल्या लाडक्या बापूंच्या दर्शनाची वाट पाहत उभे होते.........आम्ही जरा पाउस आत आला कि वस्तू भिजू नयेत म्हणून धावपळ करीत होतो........पण बाहेर तर भक्त भिजून भिजून थंड झाले होते........त्यामध्ये मोठ्यांबरोबर आलेली चिमुरडी मुलेही तितक्याच उत्साहात थांबली होती.......एकानेही आम्ही आत येऊ का, आमच्या या लहानग्याला आत घेता का, असा साधा प्रश्नही विचारला नाही...........आज मी कार्यकर्ता आहे......पण जर मला रांगेतून दर्शन घ्यायला सांगितले तर मी या भक्तांसारखी तासंतास रांगेत उभी राहू शकेन का? असा प्रश्न माझ्या मनात आला.......आणि माझ्या सबुरीची काय अवस्था आहे याचे उत्तर माझे मलाच मिळाले...........दुपार झाली तरी पाउस थांबण्याचे नाव घेईना........छत्रीचा काडीचाही उपयोग होत नव्हता........
रांग पुढे सरकत होती पण तरी सुद्धा भरपूर वेळ लागत होता..........इतक्यात आमच्या stall च्या मागील बाजूने नंदाई आणि सुचीतदादा सगळ्यांना भेटायला आले.......सगळे shock मधेच होतो.........सगळीकडे नुसता 'हरी ओम आई' चा गजर सुरु झाला.......जिथे डोक्यावर ईश्टीका
घेऊन प्रदक्षिणा मारायची होती, तिथेच आई आणि दादा थांबले  होते.......तिथे असलेल्यांना तर पर्वणीच होती......बाजूलाच असलेल्या गणपतीच्या मूर्तीदेखील आईने कौतुकाने पाहिल्या........सगळ्या भक्तांना आई भरभरून प्रेम देत होती.......तिथे जमलेल्यांपेक्षा आईलाच सगळ्यांना भेटून अतिशय आनंद झाला होता..........आणि ते पाहून आम्हाला खूप छान वाटत होते........
आई आणि दादा पुढे आले........उजवीकडे वळून आमच्या counter पाशी आले........तेव्हा तेवढ्यात दादांनी आईला बोलाविले आणि इकडे ये असे सांगितले..........आई, दादा काय म्हणतात ते बघायला परत मागे गेली.......तेव्हा दादांनी आईला सांगितले, ते बघ दाराच्या बाहेर किती जण उभे आहेत.........आणि क्षणार्धात आई आणि दादा दाराच्या जवळ गेलेसुद्धा.........आई दरवाज्याच्या अगदी जवळ जाऊन सगळ्यांना हरी ओम करीत होती........आपण कल्पनाही करू शकणार नाही कि बाहेर तासंतास पावसात चिंब भिजून परत परत भिजणाऱ्या त्या भक्तांना त्या क्षणी काय वाटले असेल......... my god......उभ्या उभ्या माझ्या डोळ्यात खळकन पाणी आले, कितीही  काहीही झाले तरी आई ही फक्त आईच असते......तिलाच आपल्या बाळांची काळजी वाटत असते.......आईला पाहिल्यावर पाउस बिउस काही नाही........'कल्लोळ' झाला त्या ठिकाणी.......मीनावैनिंचेच शब्द आठवले.....पावसालाही क्षणभर काही कळले नसेल....कारण आईच्या प्रेमाच्या धुवाधार वर्षावामुळे त्याचा गडगडाट ही फिका झाला होता.......अस वाटले कि असा पावसाळा वर्षातून एकदाच कशाला सतत होत राहो......आई आणि दादा तिथून समोरच्या प्रत्येकाला कितीतरी वेळ हसून हरी ओम करीत होते.......अजून त्यांची कृपा वेगळी काय असते? आपण कितीही असमर्थ असलो तरी आपली आईच बाळांकडे धावत येते........आपण आई-बापुंपर्यंत पोहोचूच शकत नाही.........आपला देव आपल्यासाठी खाली येतो, आपल्या बाळाला उचलून जवळ घेण्यासाठी आईच खाली वाकत असते, हो ना?.....आपण काय करतो? काहीही नाही.......आपण फक्त टाहो फोडायचा असतो.......आई-बापूंनी येण्यासाठी.......आणि त्यांना आपल्यापर्यंत आपले दादा आणत असतात ......या एका घटनेतून किती विचारचक्र सुरु झाली माझे मलाच कळले नाही.........भक्तीशील मध्ये बापूंनी एका अभंगाचा अर्थ सांगताना हेच सांगितले........कि वासरू फक्त हंबरडा फोडू शकते.......पण त्याच्याकडे धावत येते ती गायच .......त्याची आईच.......वासरू आईला शोधू शकत नाही, त्याची ती कुवत नाही, पण आई बाळाकडे धावत येते सगळे सोडून......हे तिचे अकारण प्रेम आहे.......आपण काय भक्ती करणार........कष्ट फक्त आपला देव घेत असतो, पण आपण त्याचे ऐकले तर त्याचे कष्ट आपण सार्थकी लावू शकतो.........हेच आपल्या हातात आहे..........मला आद्य पिपादादांच्या अभंगाच्या ओळी आठवल्या....तेवढे माझ्या हातून घडले तरी खूप........

माझे बापू माई नंदा मार्ग दाविती सुचीतदादा,
इतुके सोपे जीवन झाले, बसल्या जागी देव आले,
उठून बसण्या दमलो नाही.....
हीच काय ती सेवा घडली.....
हीच काय ती सेवा घडली.....

हरी ओम 

00000000000000000000000000000000000 

Hari om
 

कोल्हापूर मेडीकल कॅम्प.......नंदाई सगळ्यांना भेटायला निघाली होती.....सगळे ground  फिरून झाले......शेवटी परत सगळे आईला भेटायला एकत्र  जमले......सगळ्यांना एकत्र घेऊन आई अतिशय आनंदाने बोलत होती......उद्यापासून कॅम्प सुरु होणार......सगळ्यांनी अफाट काम करायचंय...........आणि मजा पण करायची.......इथे काम करून, सेवा करून जो आनंद मिळतो........तो बाहेरच्या जगात कुठेही तुम्हाला मिळणार नाही...............मला तुम्हाला सगळ्यांना आनंदी बघायचंय........तुम्ही सगळे आनंदी झालात कि मी पण आनंदात असणारच.........मी तुमच्या बाबांना Promise केलं आहे..........सगळेजण आनंदी हेच मी तुमच्या बाबांना gift देणार आहे २०२५ मध्ये.......मग करणार ना मला मदत?..................तेव्हा सगळीकडून इतक्या जोरात हो आला कि सगळा आसमंत भरून गेला........आजपण आई आम्ही तुला हेच gift देणार कि ज्या गोष्टींनी तुला आनंद मिळतो त्या आम्ही कायम करत राहणार.....लगेचच नाही जमणार, पण दरवर्षी तुझ्या वाढदिवसाला आम्ही आमचे प्रयास वाढवत राहणार.......तुला आनंद देण्याचे..........तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.............हरीओम  
oooooooooooooooooooooooooooooooooooo

ऐ मां......




 नवविधा निर्धार 



निर्धार 

राम माझा राजा आहे व मी राजरामाचा सैनिक आहे.
माझ्या ह्या राजाचा व त्याच्या अधिराजाचा (किंगमेकर) - दत्तगुरुंचा स्वभाव, संकल्प व बल यांची माहिती करुन घेणे व रामाला वनवासाला कोण व कसे व रामाला वनवासाला कोण व कसे पाठवतो हे जाणणे एवढाच माझा ज्ञानमार्ग.

निर्धार 2
रामाच्या वानारसैन्यातील उत्तम सैनिक बनण्यासाठी आवश्यक ती शिस्त, अनुशासन; देहाला (शरीर, प्राण, मन व बुद्धि) ह्यांना लावणे एवढाच माझा योगमार्ग.

निर्धार 
आपण रामाचे सैनिक आहोत हे जाणुन आपले कुठलेही काम उत्कृष्टरित्या कसे करावे हे शिकणे एवढाच माझा कर्ममार्ग.

निर्धार 
वानरसैनिकाने स्व:ताचे सामर्थ्य सातत्याने वाढवतच राहणे एवढाच माझा भक्तिमार्ग. (श्री हनुमंत, बिभीषण, भारत व शबरी ह्यांचे आचरण)

निर्धार 
रामाच्या वानार्सेनेट सामील झाल्यापासून लन्केपर्यन्तचा, सेनानायक हनुमंत व वानार्सेनेचा प्रवास म्हणजेच 'सुन्दरकाण्ड' मार्ग.
ह्या प्रवासाचे चिंतन व आभ्यास (study एंड प्रक्टिस) हाच दू:खनिवृत्तीचा व परमेश्वर प्राप्तीचा सर्वात श्रेष्ठ व सर्वात सोपा उपाय आहे.

निर्धार 
रावणाशी युद्ध माझे राम-लक्ष्मणच करणार.
मी फक्त त्यांचा उत्तम सैनिक बनून राहणार.

निर्धार 
रावणाशी लढणार्या माझ्या राम-लक्ष्मणांचे रक्षण हनुमन्तच करणार.
मी हनुमंताचेच मार्गदर्शन स्वीकारणार.

निर्धार 
रावणाचा नाश राम करतोच.
रामराज्य स्थापन होतेच.

निर्धार 
जो आज रामाचा वानर तोच पुढे कृष्णाचा गोप.
अर्थात निरंतर सख्य.
कधीही न बुडणार्या गोकुळात सदैव निवास.


**********************************************************



What indeed is the Ramrajya? When the subjects (people) of the kingdom are happy, they are not sad, not miserable, not helpless, not starved and hungry, they are not targets for abuse and contempt, they are not kicked around, the reign or the prevailing state is called the Ramrajya.

he pravachan that Parampoojya Sadguru Shree Aniruddha Bapu (Dr. Aniruddhasinh Joshi) delivered onThursday 6th May 2010 at Shreharigurugram.

Follow the link below to view the same.

http://www.manasamarthyadata.com/data/eng/ramrajya_e.pdf



Thanks and Regards,
Manasamarthyadata Team

3 comments:

DR.SONALI KESARI. said...

AAI TULA VAADHDIVSAACHYA KHUP...ANIRUDHA SHUBHECHAA!!!TULA JE AAVADTE TECH KARNYAACHE AAMMCHE PRAYAAS VAADHAT RAAHOT HICH ICHAA..........HARI OM.

Unknown said...

Aai Khup khup shubhecha !!

@sona -Thanks for giving this कोल्हापूर मेडीकल कॅम्प updates.

स्पंदन said...

khup khup khup chan
shri ram mhan ok...

Ads Inside Post